Thursday, 16 October 2014

ll श्री संताजी महाराज जगनाडे ll ll श्री संताजी महाराज जगनाडे ll ll श्री संताजी महाराज जगनाडे ll


       मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र चाकण या गावी शके १५४५ साली आई मथुबाई व वडील विठोबा यांच्या पोटी संताजी महाराजांचा जन्म झाला.  आजोबा भिवा व आई-वडील यांच्या धार्मिक वृत्तीचा प्रभाव त्यांच्या बालमनावर होऊ लागला. चक्रेश्वरच्या मंदिरात येणाऱ्या वारकऱ्यांचा व यात्रेकरूंचा सहवास आईमुळे संताजीना घडू लागला. 

       चक्रेश्वरच्या मंदिरात आश्रयासाठी असलेले अनेक लोक असत. या लोकांमध्ये अनाथ, भिकारी, गोर-गरीब यांचाही समावेश होता. या लोकांना घरदार नसल्यामुळे ते चक्रेश्वरच्या मंदिरातच असरा व आपला निवारा करून राहत होते. यातील बराचश्या लोकांचिया अवस्था दयनीय होती. मिळेल त्या अन्नावर आपले पोट भरून दिवस काढण्याचे काम ही गरीब भिकारी लोक करत होते. 

        अनेक लोक अन्नावाचून तडफडत होती. मंदिरात येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांकडे पाहत होती आणि म्हणत होती, "भूक लागलीये, भूक लागलीये"… अनेक लोक त्यांच्याकडे पाहून तसेच पुढे जात होतॆ. त्यांच्या भुकेच्या आकांताने येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांकडे पाहत भूक लागली-भूक लागली असल्याचा जप हा चालूच होता. 

       नियमित श्री संताजींच्या आई चक्रेश्वरच्या मंदिरात जात असत. त्यांचा नित्यनियम कधी चुकला नाही. आईबरोबर छोटे संताजीही मंदिरात दर्शनासाठी जात असत. 


         असेच एक दिवस संताजी महाराज आणि त्यांच्या आई चक्रेश्वरच्या मंदिरात दर्शनासाठी चालल्या होत्या. रस्त्यातच एक भिकारी बसला होता. त्याच्याकडे पाहता कुणालाही  की,  भूक लागली आहे. जीवाच्या  येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे तो जीवाच्या आकांताने खाण्यासाठी मागत होता आणि त्याच वेळेला संताजी आणि त्यंच्या आई तेथून जात होत्या. आईच्या हातात श्री चक्रेश्वरास नैवद्य दाखवण्यासाठी आणलेले ताट होते. याच परिस्थितीत तो भिकारी म्हणत होता, मला भूक लागली आहे- मला भूक लागली ये … ये माय, भूक लागलीये… 


          या गरीब आजोबाकडे पाहून संताजी म्हणाले, "थांब आई," संतांजीनी आईच्या हातातील ताट घेतले आणि त्या गरीब भिकार्याकडे वळले व त्याच्याकडे जाऊन त्यांना म्हणाले, "हे घ्या, तुम्हाला भूक लागली आहे का?" तो गरीब भिकारी त्यांच्याकडे पाहतच होय मला भूक, लागलीये, मला  द्या. " संताजीनी आपल्या आईकडे वळताच आईला म्हणाले, "पाहिलस आई, आपण जर हे अन्न त्यांना दिल नसत तर कदाचित त्यांचे प्राणही गेले असते. " संताजीच्या आई संताजीकडे पाहतच पाहतच राहिल्या आणि म्हणाल्या, "अरे काय हा वेडेपणा करतोयेस, तू हे ताट यांना खायला दिल, आता मी देवळात काय नेऊ. "त्यावर संताजी म्हणाले, "आई आपण यांना जेवण तर दिले, नेहमी तूच सांगतेस ना, ज्यांना अन्नाची प्रथम गरज असते, त्यांना ते देणे हीच ईश्वर भक्ती असते. " आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, आई हसतच म्हणाली, "अरे तू सुद्धा काही खोल्ल नाहीस," त्यावर संताजी म्हणाले, "आई, तू त्यांना जेवण करताना पाहिलस, त्यांनी आपण दिलेले अन्न खूप आवडीन खाल्ल आणि आपल्याकडे समाधानान पाहिल यातच माझ पोट भरल कर्मश:


     



Friday, 10 October 2014

ll श्री ll
ll निर्गुण हा घाणा, गुणातील जाणा ll


          
           श्री. संत जगनाडे महाराज हे जगतगुरू तुकाराम महाराजांचे शिष्य होते. ते  त्यांचे चौदा टाळकरी यांच्यापैकी एक प्रमुख टाळकरी होते. ते तेली समाजाचे होते हे अवर्जून सांगावस वाटते.  कारण वारकरी संप्रदाय समाजाच्या तळागाळापर्यंत कसा पोहचला होता, याचे एक महत्वाचे प्रमाण म्हणजे संताजी महाराज होते. 
          तुकोबारायांची आपल्याला लाभलेली अभंग संपदा, हा मराठी भाषेचा संताजी जगनाडे महाराजांचा एक अनुग्रह आहे. श्री संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांचे लेखकु होते. तुकाराम महाराजांची उस्फुर्त प्रतिभा त्यांनी केवळ शब्दांकित आणि अनुवादित केली नाही, तर तिचे जीवापाड जतनही केले. गेल्या तीन शतकापासून मराठी भाषिकांच्या अंतकरणात ती सिरपात करण्याचे काम श्री संत जगनाडे महाराज यांच्या अनन्य कार्यातून पार पडलेले आहे, आणि म्हणूनच त्यांचे जीवन, त्यांच्या जीवनात घडलेले परिवर्तन, त्यांनी तुकोबांचे स्वीकारलेले व मिळविलेले लेखात्व, गाथेच्या रक्षणासाठी लावलेली जीवाची बाजी आणि अश्या प्रकारे आपल्या आयुष्याचे केलेले सार्थक या सर्वच कार्यासाठी धन्य-धन्य संताजी महाराज, धन्य-धन्य……! 

ll श्री संताजी जगनाडे महाराज कि जय  ll

Thursday, 9 October 2014


कहानी संताजी महाराजांची 

संताजी महाराज जगनाडे 


                 श्री.संताजी महाराज जगनाडे यांचा जन्म इ. स. १६२४ मध्ये  पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण या गावी झाला, त्यांचे वडील विठोबा तर आई मथाबाई असे होते. हे दोघेही मोठ्या धार्मिक प्ररुत्तीचे होते. घरात सदैव परमेश्वरचा, ईश्वराचा, विठ्ठलाचा जयजयकार असायचा, अश्या या धार्मिक कुटुंबात श्री संताजी महाराज जगनाडे यांचा जन्म झाला.

        खेड तालुक्यातील चाकण हे प्रसिद्ध बाजारपेठेचे ठिकाण होते.  संताजीचे वडील विठोबा हे खाद्यातेलाचे उत्पादन घेण्याच्या छंदात गुंतले होते. खाद्यतेलाचा व्यवसाय हा वादिलोपार्जीतच होत. संताजी एक प्रसन आणि ग्रामीण वातावरणात लहानाचे मोठे झाले. त्यांनीही आपला वडिलोपार्जित व्यवसाय सुरूच ठेवला होता. 
            ग्रामीण आणि अध्यात्मिक वातावरणात संताजी मोठे होत होते. तसतसे त्यांचा  अध्यात्मातला रस वाढतच चालला होता. संताजी लहानपणापासूनच आपल्या आईबरोबर गावातच असलेल्या चक्रेश्वरच्या मंदिरात नियमित देवदर्शनासाठी जात असत. क्रमश:

*********************************************************************************