Thursday, 11 December 2014

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा २०१४



श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा २०१४



               श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी सोहळा २०१४ सालाबाद प्रमाणे शनिवार दिनांक २० डिसें. २०१४ रोजी श्री क्षेत्र सुदूंबरे येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर उत्सवाचे निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह दि. १४/१२/२०१४ पासून सुरू होत असून त्या मध्ये महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकार हजेरी लावणारा आहेत. दिनांक १४/१२/२०१४ ते २०/१२/२०१४ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह, किर्तन, भजन, प्रवचन होणार आहे.
                श्री. संताजी महाराज जगनाडे हे जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे समकालिन संत असुन त्यांनी तुकाराम महाराजांच्या गाथेचे लिखाण व संगोपण केले. सदर पुण्यतिथी सोहळ्या निमित्त महाराष्ट्राच्या व देशाच्या कानाकोपर्‍यातून महाराजांचे भक्तगण दि. २०/१२/२०१४ रोजी श्री क्षेत्र सुदूंबरे येथे जमा होणार आहेत.
श्री. क्षेत्र सुदूंबरे हे महाराष्ट्र शासनाने तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून घोषीत केले आहे. सदर पुणयतिथी कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

No comments:

Post a Comment